राज्य सरकारला ‘ती’ चूक उमगली; राष्ट्रभाषा असल्याचा उल्लेख हटवला | Eknath Shinde | National Language

2023-01-19 2

हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे की नाही? हा वाद तसा फार जुना आहे. पण आता हा वाद पुन्हा निर्माण झाला, ज्याला कारण ठरलं महाराष्ट्र शासनाने काढलेला जीआर. या शासन निर्णयाच्या प्रस्तावनेतलं पहिलंच वाक्य होतं ते म्हणजे ‘हिंदी ही राष्ट्रभाषा असल्यामुळे…’. या 'जीआर'वरून राज्य सरकारवर टीका झाली. अगदी सोशल मिडियावर सुद्धा यावरून वादविवाद पाहायला मिळाला. यानंतर आता प्रस्तावनेत बदल करण्यात आला आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे की नाही? राज्यघटना याबाबत काय सांगते, तसेच राष्ट्रभाषा आणि राजभाषा यात काय फरक असतो? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#Hindi #EknathShinde #NationalLanguage #NewGR #DevendraFadnavis #Constitution #StateGovernment #Maharashtra #PriyankaChaturvedi #BJP #Shivsena #HindiLanguage

Videos similaires